ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू
देश बातमी

ज्या दवाखान्यात ५० वर्षे सेवा दिली तिथेच व्हेटिंलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा मृत्यू

प्रयागराज : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्तरप्रदेशातही कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. एक ८५ वर्षीय वरिष्ठ डॉक्टर जे के मिश्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात काम करत होते. कोरोना झाल्यानंतर ते याच रुग्णालयात दाखल झाले होते. पण जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती तेव्हा मात्र त्यांना मिळाला नाही आणि पत्नीच्या डोळ्यांसमोर त्यांनी जीव सोडला. इतकी वर्ष ज्या रुग्णालयात त्यांनी सेवा दिली त्याच रुग्णालयात सुविधांअभावी मृत्यू होण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जे के मिश्रा यांना १३ एप्रिलला कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. तीन दिवसांनी त्यांनी एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अजून खालावली. त्यांना व्हेंटिलेटर सुविधा असणाऱ्या बेडवर शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण शहरात एकाही रुग्णालयात सुविधा नव्हती.

रुग्णालयात एकूण १०० व्हेंटिलेटर होते. पण मिश्रा यांच्या आधी दाखल झालेल्या रुग्णांना ते देण्यात आले होते असं रुग्णालयाने सांगितलं. कोणत्याही रुग्णालयाचा व्हेंटिलेटर काढून मिश्रा यांना देणं शक्य नव्हतं असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सध्याच्या घडीला २ लाख ९७ हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.