अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय

अमेरिका : अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून मागील २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेत फायझर लसीच्या आपात्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही १०० दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीनं फायझरच्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी १७ विरूद्ध ४ मतांनी लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली. तर एक सदस्या या प्रक्रियेत सहभागी झाला नव्हता.

गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत कोरोनामुळे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली. हा घटनाक्रम संपूर्ण परिस्थिती अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. आम्ही वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारी आहोत. अमेरिकेसमोर लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाचं आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राष्ट्राध्य जो बायडेन यांनी दिली.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे, असं एका तज्ज्ञानं सांगितलं. यापूर्वी फायझरच्या लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियानं मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीनं परवानगी मागितली आहे.