डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरताय? मग रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी पासून केलेले ‘हे’ बदल आधी वाचाच
देश बातमी

डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरताय? मग रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी पासून केलेले ‘हे’ बदल आधी वाचाच

नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या नियमात हा बदल होणार आहे. या बदलामुळे तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 5000 रुपयांपर्यंत कोणत्याही पिनशिवाय सहज पेमेंट करू शकता. आतापर्यंत फक्त कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पिनशिवाय जास्तीत जास्त 2,000 रुपये काढता येऊ शकत होते. पण आता याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेव्हा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्ही कार्ड PoS मशीनमध्ये घातला आणि त्यानंतर पिन क्रमांक टाकून पुढे व्यवहार करता. यानंतर तुम्हाला बिलही मशीनद्वारे मिळतं. पण कॉन्टॅक्टलेस कार्डला एक चिप जोडलेली असते. ज्याच्यासोबत स्ट्रिप आणि NFC अँटेना असतो. NFC अँटेना संपर्करहित म्हणजेच कॉन्टॅक्टलेस व्यवहार करतो. यासाठी तुम्हाला कार्ज पीओएस मशीनमधून स्वाइप करण्यासाठी आणि एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी चिपचा वापर केला जातो.

बँकेने जारी केलेल्या प्रत्येक कार्डमध्ये ही सुविधा असते. ही सुविधा मिळविण्यासाठी, कार्डच्या उजव्या बाजूला वाय-फाय नेटवर्कचा लोगो असेल. ते अॅक्टिव्हेट करून घेतलं की तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या या सेवेमुळे पिन प्रविष्ट न करता 5 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार आहे. या सुविधेमुळे पिन कोणी चोरी करण्याचा धोकाही टळणार आहे. याचबरोबर व्यवहार करणं आणखी सोयीचं आणि जलद गतीने होतं. मात्र अशावेळी आपलं कार्ड कुठेही हरवणार नाही याची काळजी ग्राहकांनी घेतली पाहिजे.