मोठी बातमी : ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

मोठी बातमी : ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोट्या भावाचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाबाधित असीम बॅनर्जी यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज (ता. १५) सकाळी त्यांनी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कोलकातातील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. असीम बॅनर्जी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ असीम बॅनर्जी यांचं आज सकाळी रुग्णालयात निधन झालं आहे. ते कोरोनाबाधित होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते, असं मेडिका रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अलोक रॉय यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे.