फेसबुकनंतर यूट्यूबचाही तालिबान्यांना दणका
बातमी विदेश

फेसबुकनंतर यूट्यूबचाही तालिबान्यांना दणका

नवी दिल्ली : फेसबुकनंतर यूट्यूबनेही तालिबान्यांना दणका दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यातच फेसबुकने कारवाई करत तालिबानला फेसबुकच्या सेवांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फेसबुकने तालिबान ही अमेरिकेच्या कायद्यानुसार दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले होते. फेसबुक पाठोपाठ आता यूट्यूबने देखील तालिबानच्या मालकीचे आणि त्यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. अमेरिकन सोशल मीडिया कंपन्यांनी मंगळवारी अफगाणिस्तानमधील काही गटांसाठी त्यांचे नियम स्पष्ट केले आहेत.

फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने तालिबानने काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर तक्रार हेल्पलाइन बंद केली आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार, तालिबानचे अधिकृत खाते म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी हिंसाचार, लूटमार किंवा इतर समस्यांची तक्रार करण्यासाठी असलेला इमरजेन्सी हॉटलाइन नंबर फेसबुकने ब्लॉक केला आहे. यासह त्यांनी तालिबानचे काही अकाउंट्सदेखील ब्लॉक केले आहेत.