कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार
राजकारण

कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार

पुणे: कसबा पोटनिवडणुकीचे वातावरण आता चांगलेच पेटले आहे. कसब्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरची राज्यभर चर्चा होत असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते.’कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळे हाच धागा पकडत आता हिंदू महासंघ देखील कसब्याच्या रिंगणात उतरले आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे हे आता कसब्याच्या रिंगणात उतरले आहेत. आनंद दवे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ‘कसबा मतदारसंघातून हिंदू महासंघाचा उमेदवार म्हणून उद्या मी स्वतः अर्ज भरतोय. ही निवडणूक चुरशीची आणि जिद्दीची सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी जेव्हा लोक टिंगळी टवाळ्या करत होती तेव्हा ज्या समाजाने भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे सर्वाधिक प्रयत्न केले. त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय’. असं आनंद दवे म्हणाले आहेत.

यामुळेच स्वतः मी कसब्याच्या रिंगणात उतरण्याचा विचार केलेला आहे. आम्ही उद्या फॉर्म भरतोय. कसब्यात लागलेले सगळे बॅनर असतील. आज टिळक कुटुंब, नगरसेवक किंवा पदाधिकारी हेमंत रासने यांच्या मिरवणुकीत न जाण असेल. ही भारतीय जनता पक्षाला धोक्याची सूचना आहे. हिंदू महासंघाचा उमेदवार निवडून येईल याची खात्री आहे, असे देखील आनंद दवे म्हणाले आहेत.