काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडी : काँग्रेसची गळती सुरुच असून सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे भिवंडीतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून 2 नगरसेवक बाहेरगावी असल्याने त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भिवंडी महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीपासून सुरु असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे. भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. भाजपाला मदत केली म्हणून काँग्रेसने नोटीस दिली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी नकार दिला होता. मात्र सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आता मनपात राष्ट्रवादीचे संख्याबळ नसतांनाही काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादीची शहरातील ताकद वाढली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नगरसेवक
मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे
माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख
तात्यासाहेब ताम्हाणे
पोपटराव बोराटे
चंद्रकांत कारंडे
दादासो भिसे
जनार्दन सोनवणे
प्रकाश टिळेकर
अशोकराव बोराटे
संतोष जाधव
शिवराम ताम्हाणे
आतिष बोराटे
सतिश खुने
बिभिषण खुने
संतोष ढोरले यांचा प्रवेश झाला असे ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केले आहे.