आम आदमी पक्षाचा मोठा निर्णय; सहा राज्यांत निवडणूक लढवणार
राजकारण

आम आदमी पक्षाचा मोठा निर्णय; सहा राज्यांत निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने देशातील एकूण सहा राज्यांमधील निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. याचबरोबर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदीया यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत या हा निर्णय घेण्यात आला. या अगोदर केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची डिसेंबरमध्ये घोषणा केली होती.

कोणकोणत्या राज्यात निवडणुका लढवणार?
१) उत्तर प्रदेश
२) उत्तराखंड
३) गोवा
४ पंजाब
५) हिमाचलप्रदेश
६) गुजरात या सहा राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांध्ये आम आदमी पार्टी देखील सहभागी होणार आहे. या राज्यात पुढील दोन वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत.