दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक
देश बातमी

दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात सण […]

राज्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिल्लीत
राजकारण

राज्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिल्लीत

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहित क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. आशिष देशमुख यांच्या या लेटरबॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. क्रीडमंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. आशिष देशमुखांच्या आरोपानंतर क्रीडामंत्री सुनील केदार दिल्लीत […]

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घसरण झाली आहे. मागील वर्षभरामध्ये मोदींची लोकप्रियता तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे. […]

नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या
देश बातमी

नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या

नवी दिल्ली : दिल्लीत एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपींनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली आहे. सोबतच पोलिसांना याबद्दल कळवू नका, अन्यथा प्रकरण अजून गुंतागुंतीचं होईल असंही त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. दिल्ली कँटोन्मेंट परिसरातील […]

काँग्रेसला मोठा झटका! माजी प्रदेशाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका! माजी प्रदेशाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या दिल्लीमधील पक्षकार्यालयात गोविंददास यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंददास यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे मणिपूरमध्ये […]

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन
राजकारण

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाळ संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे. घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त […]

दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस
क्रीडा

दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस

नवी दिल्ली : अटकेत असताना कुस्तीपटू सुशिलकुमारसोबत फोटो काढण्याची हौस दिल्ली पोलिसांना चांगलीच महागात पडली आहे. शुक्रवारी सुशीलकुमारला मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी मंडोली तुरुंगाबाहेर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसोबत काढलेले फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटोसेशन आता पोलिसांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात […]

शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
राजकारण

शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. २३ जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट […]

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
राजकारण

केजरीवाल यांची घोषणा! ‘या’ राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला असून आप २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज (ता. १४) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडवणुकीआगोदर गुजरातमध्ये आपचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादमध्ये होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही […]

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी
देश बातमी

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये भीषण अग्नी तांडव पहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही दिल्लीमधील सर्वात मोठी आग आहे. सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप घेतले आहे. अग्निशमन […]