बार्टीचे महासंचालक सक्तीच्या रजेवर; धनंजय मुंडेच्या विरोधात वातावपण तापलं
राजकारण

बार्टीचे महासंचालक सक्तीच्या रजेवर; धनंजय मुंडेच्या विरोधात वातावपण तापलं

मुंबई : वैद्यकीय रजा संपवून परत आलेले बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना त्यांच्या पदावर रुजू करून न घेता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्यभर वातावरपण तापले असून नागरिक नाराज आहेत. शिवाय ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यात चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीच्या वतीनेही धनंजय मुंडे यांचा निषेध करत या निर्णयाचा विरोध करण्यात आला. यावेळी रवी वडमारे, भीमराव कांबळे, अभिजित गायकवाड, रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घोषणाही देण्यात आल्या.

धम्मज्योती गजभिये यांच्या बाबतीत सामाजिक न्याय विभागाने लेखी आदेश जारी केले. परंतु त्याचे कुठलेही कारण दिलेले नाही. शासनाच्या या निर्णयावरच नागरिकांचा आक्षेप आहे. पुण्यासह नागपूर शहर राज्यभरात म्हणून याविरुद्ध आंदोलने होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये २७ ऑगस्ट २०१९ ते २३ सप्टेंबर २०१९ या दरम्यान वैद्यकीय रजेवर होते. विभागातील काम खोळंबू नये यासाठी त्यांचा कार्यभार सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दि. रा. डिंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यानंतर आपली वैद्यकीय रजा संपवून गजभिये आपल्या कामावर रुजू झाले. परंतु त्यांना त्यांचे मूळ कार्य त्यांना सोपविण्यात आले नाही. उलट त्यांना प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर ठेवण्यात आलेच्या आदेश जारी करण्यात आला.