राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर
राजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप प्रवेशासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. भाजप-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा शिंदे यांनी केला आहे. शशिकांत शिंदे यांनी शनिवारी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिंदे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असे शिंदे म्हटले आहे.

त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपमध्ये जात असतानाही मला ऑफर आली होती, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी शशिकांत शिंदे हे एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे.