रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. असं असतानाच बुधवारी भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. पाहिली तक्रार ऋषिकेश अहेर यांनी मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात दाखल केलीय. देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.

दुसरी तक्रार सुनील रघुनाथ केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात दाखल करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये योगी असताना आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले त्यांनी एखाद्या गुहेमध्ये जाऊन ध्यान साधना करायला हवी. तसेच योगी यांना चप्पलांनी मारण्याची भाषा या व्हिडीओत केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

तिसरी तक्रार शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरेंविरोधात दाखल केली असून यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधील शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचंही नाव आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये बुधवारी (ता. २५) राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द म्हणजे राणेंना संविधानानुसार देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री पदाचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. तसेच बोरस्ते यांनी या लेखाचे पोस्टर बनवून ते जागोजागी लावून बदनामी केल्याप्रकरणी रश्मी ठाकरे आणि बोरस्तेंविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.