भाजप नेता म्हणतो, ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते…’
राजकारण

भाजप नेता म्हणतो, ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते…’

मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत, असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे, असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे, असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.

आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.