महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू
राजकारण

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रामधून नारायण राणेंबरोबरच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हिना गावित यांचे वडील विजय कुमार राष्ट्रवादीमध्ये होते आणि ते राज्यात मंत्री होऊन गेले आहेत. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा आहे.