भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार; चौघांना अटक
राजकारण

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत गोळीबार; चौघांना अटक

बंगळुरु : कर्नाटक भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बंदुका परवानाधारक असून इतर दोन बंदुकांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यादगीर येथे मंगळवारी यात्रेमध्ये हवेत गोळ्यांचे काही राऊंड झाडण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बाबाराव चिंचांसूर बंदूक घेऊन पोज देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. केंद्रीय मंत्री भगवंत खुंबा यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत केंद्रात नवीन मंत्री झालेल्यांची ओळख करून देण्यात आली.

कर्नाटकमधून चार भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री अनेकल नारायणस्वामी, पशुसंवर्धन राज्यमंत्री एल मुरुगन, कृषी राज्यमंत्री शोहबा करंदलाजे आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा यांचा समावेश आहे. दरम्यान, २२ राज्यांमध्ये भाजपाकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत.