दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
राजकारण

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आलं आहे.

देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्णय घेऊन वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपविण्यात आले.