आयुक्त पदावरून बदली केल्यामुळे परमबीर सिंह नाराज; स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात
राजकारण

आयुक्त पदावरून बदली केल्यामुळे परमबीर सिंह नाराज; स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले परमबीर सिंह नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे परमबीर सिंह हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. अशातच परमबीर सिंह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.

गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना जवळ सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्या प्रकरणावरून झालेल्या गोंधळामुले परमबीर सिंह अडचणीत आले आहेत.