छगन भुजबळांच्या टीकेला उदयनराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

छगन भुजबळांच्या टीकेला उदयनराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

सातारा : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या टीकेला खा. उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले असून छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, असे म्हणत उदयनराजेंनी भुजबळांना टोला लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उदयनराजे पुढे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षणाच्या अभ्यासाचा विषय कुठे येतो. आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल तरीही मला त्याबाबतची जास्त समज आहे. माझा अभ्यास कमी असेल पण ज्यांचा याविषयी अभ्यास आहे त्यांनी आरक्षण का मिळाले नाही याचे उत्तर द्यायला हवे. मला तर याबाबत उत्सुकता आहे. छगन भुजबळ यांचा अभ्यास जास्त असेल तर त्यांनी उत्तर द्यावे.

भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबाबत काही बोलणार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या बाबतचा अभ्यास करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आरक्षण का मिळाले नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता मला आहे, परंतु याबाबत कोणी बोलत नाही. जे इतरांचे आरक्षण आहे ते त्यांना द्या. माझा जर अभ्यास असता तर मी माझ्या मनाला येईल असेच केले असते, असेही उदयनराजे म्हणाले.