पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ

पुणे : वानवडी परिसरात एका 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. सोशल मीडियावर ‘टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच याबाबतच्या काही ऑडिओ क्लिप्स देखील जोरदार व्हायरल झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. ”पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत” अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसेच या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, असं देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी बोलताना भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे? हे तपासलं पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे. या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताहेत” असा गंभीर आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.