अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती
मनोरंजन

अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; पहा कोण आहे तिचा भावी पती

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. येत्या १५ फेब्रुवीराला हा विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्याला काही जवळची मंडळी उपस्थित राहणार आहेत. मागच्यावर्षीपासून दिया वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती. दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वी दियाचे उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न झाले होते. पण ऑगस्ट २०१९ मध्ये लग्नाच्या पाच वर्षानंतर दिया आणि साहिल विभक्त झाले. त्यांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनदरम्यान दीया आणि वैभव यांच्यातील मैत्री वाढली. दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतित करू लागले. वैभव रेखी मुंबईतील बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर आहे. तसेच प्रसिद्ध योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखीचा नवरा होता. सुनैना आणि वैभवला एक मुलगीदेखील आहे.

येत्या सोमवारी (ता. १५) फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी विवाहबद्ध होतील. अत्यंत साधेपणाने घरच्या घरी हे लग्न होईल, असे माध्यमांनी म्हटले आहे. फार निवडक लोक या विवाह सोहळयाला उपस्थित असतील. मागच्यावर्षी दिया आणि वैभव परस्परांना डेट करत होते. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघाने सोशल मीडियावरुन विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये ते विवाहबद्ध झाले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते. ”एक सेलिब्रिटी असल्यामुळे माझं प्रोफेशन मला दु:खी राहण्याची परवानगी देत नाही आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी चार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. आज या घटनेला ३४ वर्षे झाली. जर चार वर्षांची असताना मी हे दु:ख सहन करु शकते तर वयाच्या ३७ व्या वर्षी का नाही?, असं दिया म्हणाली.

वयाच्या १६ व्या वर्षी दीया मिर्झाने कामाला सुरूवात केली. ती एका मल्टी मीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत होती. कॉलेजच्या दिवसात दीयाला मोठ्या कंपनीकडून मॉडेलिंगसाठी ऑफर मिळाली. मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीया मिर्झाने रहना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.