माजी खासदार गायकवाड यांचे ‘योग शिक्षक आणि परिक्षक’ परीक्षेत यश
राजकारण

माजी खासदार गायकवाड यांचे ‘योग शिक्षक आणि परिक्षक’ परीक्षेत यश

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि परीक्षक परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे. Level 3 मध्ये ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार असतानाही लातूरचे अनेक शैक्षणिक विषय लोकसभेत मांडले होते. सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि औरंगाबादला पाली विद्यापीठाचीही मागणी त्यांनी लोकसभेत केली होती. ११वीच्या वर्गात १० वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश मिळावा ही मागणी ही लोकसभेत केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतीच झालेली NEET परीक्षा केंद्र मराठवाड्यात लातूर आणि नांदेडला त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले.

माजी खासदार गायकवाड यांचा शिक्षण घेण्याचा छंद असून त्यांनी आजन्म विद्यार्थी राहायला आवडत असल्याने शिक्षण घेणे सुरूच ठेवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवारांनी विशेषता भारत सरकारचे कायदे मंत्री किरेन रीजूजू, भारत सरकार आयुष मंत्रालयाचे मत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पेट्रोलियम गॅस कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाईजर राज्यमंत्री भगवंत खुब्बा, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.