भाजपला मोठे यश; काश्मिरच्या निवडणुकांत मारली बाजी
राजकारण

भाजपला मोठे यश; काश्मिरच्या निवडणुकांत मारली बाजी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आपल्या विजयाची पताका फडकावली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार स्थानिक पक्षांच्या गुपकार आघाडीला सर्वाधिक जागांवर आघाडी आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने श्रीनगरमध्ये पहिला विजय मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फारुख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स, मुफ्तींची पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि इतर 7 स्थानिक पक्ष मिळून या निवडणुकांसाठी गुपकर आघाडी स्थापन केली होती. ही आघाडी आत्तापर्यंतच्या निकालाच्या कलानुसार काश्मिरात आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षाने जम्मूमध्ये आघाडी घेतली आहे. पण श्रीनगर जिल्ह्यात भाजपने एक जागा खिशात घातली आहे. एजाज हुसेन यांनी बलहामची जागा जिंकल्याने तिथे भाजपनं आपलं खातं उघडलं आहे.

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर आणि कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आठ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडल्या. २८० डीडीसीच्या जागांसाठी 2178 उमेदवार रिंगणात होते. 28 नोव्हेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत मतदान पार पडलं होतं.