शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार
राजकारण

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

मुंबई : शिवसेना नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि आपापल्या वाहनांमधून शिवसैनिक दाखल होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, आणि त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर काही दिवसातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आली. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता. त्यामुळे आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

दरम्यान, वर्षा राऊत 5 जानेवारीला ईडी चौकशीसाठी हजर राहतील अशी शक्यता आहे.प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच जबाब नोंदवण्यात आले असून, फक्त वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे. तथापि, ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं.