हर्षवर्धन यांचा राजीनामा; कोण असतील नवे केंद्रिय आरोग्यमंत्री?
राजकारण

हर्षवर्धन यांचा राजीनामा; कोण असतील नवे केंद्रिय आरोग्यमंत्री?

नवी दिल्ली : केंद्रिय मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाला नवीन आरोग्यमंत्री मिळणार असून नवीन आरोग्यमंत्री कोण असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी मंत्रीपदाच्या संभाव्य नेत्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हेही पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते.