विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यानंतर भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. या टीकेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा दाखला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रात इतके वर्ष मंत्री होते. राज्यात ते अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. इतके वरिष्ठ नेते असताना त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कोर्ट नव्हता. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तरीसुद्धा साधा हवालदार सुद्धा सुरक्षेसाठी नव्हता”, अशी प्रतिक्रिया दिली.

त्याचप्रमाणे, “आम्ही एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती बनविली. त्या समितीने कोणत्या नेत्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायला पाहिजे, ते त्यांनी सांगितलं. समितीने दिलेल्या अहवालानुसार आता सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणाचा कोणता पक्ष आहे? हे बघितलं गेलं नाही. आज स्वतः शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, अशी सूचना केली. सुरक्षा ही कोणाला किती द्यायची हे त्यांना असलेल्या धोक्यावरून ठरविलं जात”, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं.

‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत कपात
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाव वाय सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, विधान परिषदेचे अध्यक्ष राम राजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना वायप्लस एस्कॉर्टसह, आमदार वैभव नाईक यांनी एक्स, संदिपन भुमारे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे. तर एम. एल. टाहिलीयानी यांची झेड सुरक्षा काढून वाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. जी. ए. सानप यांचीही झेड सुरक्षा काढून वाय सुरक्षा देण्यात आली आहे.