मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नाही; धनंजय गावडेंचा खुलासा
राजकारण

मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नाही; धनंजय गावडेंचा खुलासा

मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नसून बिल्डराला वाचविण्यासाठी हे रचलेले षडयंत्र आहे, असा आरोप वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला आहे. मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात धनंजय गावडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात केला. त्यावर प्रतिक्रिया देताना गावडे यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचे सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”कोणतेही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे अन्यथा अशी बदनामी करू नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मनसुख प्रकरणात माझे नाव आल्याने मला आश्चर्य वाटत आहे. तसेच मला वाईट वाटते की इतक्या बड्या नेत्याने असे विधान केल्याचे. याबाबत पुढे बोलताना धनंजय गावडे म्हणाले की, मनसुख हिरेन कोण आहेत ते मला माहित नाही, त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही, असे धनंजय गावडे यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले. मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. त्याची पुढील महिन्यात सुनावणी आहे. त्यावर विपरित परिणाम व्हावा म्हणून गुप्ता नावाच्या बिल्डराच्या सांगण्यावरून हे कुंभाड रचल्याचा आरोप त्यांनी केला. वसई-विरार मध्ये कुठलाही गुन्हा घडला की विनाकारण माझा संबंध जोडणार का?, असा सवालही त्यांनी केला. याबाबत तपास यंत्रणेला जे सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, देशाची सर्वोत्तम तपास यंत्रणा NIA उतरली असून महाराष्ट्र पोलीस, ATS तपास करत असून सत्य बाहेर येईल. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यावर त्याचे लोकेशन वसई मिळाल्यावर कोणत्या तरी बिल्डरला वाचवण्यासाठी माझे नाव घेणे योग्य नाही. गुन्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला आहे. कोणतीही ट्रायल होऊन माझे गुन्हे साबीत झालेले नाही. यामुळे माझी बदनामी होईल असे वृत्त करू नये अशी विनंती करत आहे.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेले वाहन सापडले होते. या वाहनाचे मालक मनुसख हिरेन यांची चौकशी सुरू असताना हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला होता. हिरेन हे मृत्यूपूर्वी विरारला गेले होते असे त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन आढळले होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे नुकतेच वसईत परतले आहे. हिरेन मनसुखानी यांच्या हत्याप्रकरणात गावडे यांचा संबंध असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहात केला. त्यानंतर गावडे यांनी याबाबत खुलासा केला आहे.