धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात देशात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 133 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आज सलग सातव्या दिवशी सोमवारी कोरोनाच्या 15,388 रुग्णांची भर पडली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आता एक कोटी 12 लाख 62 हजार 707 इतकी झाली आहे. त्यामध्ये एकूण 1,58,063 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण एक कोटी नऊ लाख 20 हजार 046 लोक कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1 लाख 84 हजार 598 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीत केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी पासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत 2,40,37,644 जणांना लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे.

लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली. 2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.