मोठा निर्णय : केरळमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा ठरला उमेदवार
राजकारण

मोठा निर्णय : केरळमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा ठरला उमेदवार

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले व मेट्रोमॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ई श्रीधरन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती केरळमधील एमओएस एमईए व भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळमध्ये भाजपची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असे श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करण्याअगोदरच म्हणाले होते. तसेच, या वर्षी केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं देखील श्रीधरन यांनी सांगितलं होतं.

कोण आहेत ई श्रीधरन?
२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत.