महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक; काय आहे प्रकरण?
राजकारण

महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक; काय आहे प्रकरण?

सीकर : महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केली आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी कीर्ती कुमार यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शन करण्यासाठी जात होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीकरमध्ये कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस घुसवली म्हणून त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यामुळे तेथील वाहतूक कर्मऱ्यांनी त्यांच्या विरोधात चलान कापलं होतं. बस रोखली आणि कागदपत्रं मागितली म्हणून बसमध्ये बसलेले आमदार यावर भडकले. चलन कापल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व त्यांचा युनिफॉर्म फाडण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.

ड्यूटीवर तैनात वाहतूक महिला कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक व त्यांना अभद्र शब्दांचा वापर केल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांनाहीच मारहाण केल्याचा आरोप कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील निवासी नितेश भगडिया, त्याचे पूत्र आणि भाजप आमदार कीर्ति कुमार, श्रीकांत, अंकित आणि यवतमाळमध्ये राहणारे सुशील कोठारी यांचा समावेश आहे.