अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा
राजकारण

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत.” अशी माहिती शिरोमनी अकाली दलाच्या नेत्यांनी दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंजाबातील शिरोमनी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळविण्यासाठी आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

दरम्यान, गेल्यावर्षी शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर शिवसेना वर्षभरापूर्वी एनडीएतून बाहेर पडली. तसेच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करताना शिरोमणी अकाली दलाने काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

तर महाराष्ट्र सरकारनेही शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.