ममता बॅनर्जींचं ठरलं! २९१ उमेदवारांची यादी जाहीर
राजकारण

ममता बॅनर्जींचं ठरलं! २९१ उमेदवारांची यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे टीएमसीने २० आमदारांची नावं यादीमधून वगळली असून यामध्ये काही पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही मोठ्या नंत्यांचा समावेश आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही यादीतून वगळण्यात आलं आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी २९४ पैकी तीन जागा मित्रपक्षांसाठी उत्तर बंगाल आणि इतर ठिकाणच्या सोडल्या असल्याची माहिती दिली आहे.

यादी जाहीर करताना ममता बॅनर्जी यांनी यामध्ये एकूण ५० महिला उमेदवार, ४२ मुस्लिम उमेदवार, ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे. यादी जाहीर करतच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहेत.