विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; ट्रेलर रिलीज
मनोरंजन

विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; ट्रेलर रिलीज

मुंबई : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एनकाऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर आता या गुंडाच्या आयुष्यावर आधारित आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे नाव बिकरू कानपुर गँगस्टर असे असून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बिकरू कानपुर गँगस्टर या चित्रपटात विकास दुबे ही भूमिका अभिनेता निमय बालीने साकारली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या २ मिनिटे ६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विकास दुबेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. विकास दुबेने केलेले गुन्हे, त्याच्यावर सुरु असलेले खटले, उत्तर प्रदेशात त्याने निर्माण केलेली दहशत हे सर्व चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=0SfLV5eeCSE

बिकरू कानपुर गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती अजय पाल सिंह आणि सी पी सिंह यांनी केली आहे. विकास दुबे उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड होता. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १० जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांचे एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.