कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली
राजकारण

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली

मुंबई : संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे अशी जहरी टीकाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे, यामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत असा सवाल केला होता त्याचा संदर्भ दिला आहे.

सर्व्हेवर अंदाज बांधायचा नसतो, शरद पवार यांची एक सभा आठवतेय का? पावसामध्ये झालेली सभा सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी उमेदवार सुद्धा म्हणायला लागले होते की, पावसाला पण आत्ताच यायचे होते का? त्यामुळे अशा सर्व्हेवर काहीही नसतं, संजय राऊत यांच्या समाधानासाठी चांगले आहे., संजय राऊत यांना अत्यंत आनंद झाला आहे.

ठाकरे-आंबेडकर यांची युती झाली त्यावेळीच सांगितलं होती की युती किती काळ टिकेल माहिती नाही, दोन दिवसांत भांडायला लागले आहे अजून निवडणुकाही लांब आहे असा टोला लगावत महाविकास आघाडीतही बिगाडी होईल असे शिरसाठ यांनी म्हंटलं आहे.