पंडित नेहरू हे भारतीय लोकशाहीचे आदर्श; नितीन गडकरींकडून कौतुक
राजकारण

पंडित नेहरू हे भारतीय लोकशाहीचे आदर्श; नितीन गडकरींकडून कौतुक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतले आदर्श नेते आहेत. आपण आपल्या लोकशाहीच्या मर्यादेचं पालन करू, असं दोघेही नेते म्हणत असत. अटलजी यांचा वारसा ही आमची प्रेरणा आहे. तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान होतं, ‘असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गडकरी म्हणाले, ‘लोकशाही सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष, दोघांनीही आत्मपरीक्षण करून सन्मानाने आणि आपापली जबाबदारी ओळखून काम करायला हवं. ‘मीही पक्षाचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं. कारण आजचा विरोधी पक्ष म्हणजे उद्याचा सत्तारूढ पक्ष आणि आजचा सत्तारूढ पक्ष म्हणजे उद्याचा विरोधी पक्ष. आपल्या भूमिका नेहमी बदलत राहतात, याची जाणीव ठेवायला हवी.’

काँग्रेस पक्षाच्या स्थितीबद्दल भाष्य करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘यशस्वी लोकशाहीसाठी विरोधी पक्ष मजबूत असणं आवश्यक आहे.’ संसदेतल्या या गदारोळाच्या संदर्भाने नितीन गडकरी म्हणाले, ‘मी तर आयुष्यात कित्येक वर्षं विरोधी पक्षात काम केलं आहे. तेव्हा सगळ्यांनीच आपापल्या मर्यादांचं पालन करायला हवं. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाकं आहेत.