पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : ”सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे”, असे ट्विट करत कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या दोन-तीन दिवसात देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती १०० रुपये प्रतिलिटर इतक्या झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती यांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच शाब्दिक चकमकी सुरु झाल्या आहेत.

तसेच, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का? ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?, असा प्रश्नही नाना पटोले यांनी यावेळी विचारला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही, केंद्र सरकारने कृषिचा सेज पेट्रोल डिझेल वर लावून ३ रुपये टॅक्स कमी केला, तसे राज्य सरकार करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अधिक पेट्रोल डिझेल साठी अधिक पैसे मोजावे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.