नरेंद्र मोदी मन की बात’ मधून चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत: सुप्रिया सुळे
राजकारण

नरेंद्र मोदी मन की बात’ मधून चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत: सुप्रिया सुळे

अंबरनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अंबरनाथ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणल्या की, ‘मन की बात‘ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते.

सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर निशाना साधला. त्या म्हणाल्या की, ” केंद्रसरकारने कोव्हिड काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कापला. आम्ही कोव्हिड काळ असल्याने मान्यही केले. मात्र, मोदींनी संसदेच्या नवीन इमारत काम सुरु केले. तोच निधी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता, तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. संसदेच्या नवीन इमारतीची गरज नसताना का हा उपद्व्याप? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन दिली.