निलेश राणेंचा विनायक राऊतांना इशारा; जिथे दिसाल तिथे फटकावणार
राजकारण

निलेश राणेंचा विनायक राऊतांना इशारा; जिथे दिसाल तिथे फटकावणार

मुंबई : “इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,” अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊतांच्या या टीकेला भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विनायक राऊत यांनी नारायण राणेंचं शिक्षण काढल्याने निलेश राणे यांनी जिथे दिसणार तिथे फटकावणार अशा शब्दांत इशारा दिला आहे. ” “विनायक राऊत तुमची वेळ जवळ आली आहे. २०२४ मध्ये तुमचा बंदोबस्त करणार. तुम्हाला कायमचा कोकणातून हाकलून देणार हे १०० टक्के सांगतो. भाषा बदलली नाही तर जिथे दिसाल तिथे फटकावणार एवढं लक्षात ठेव”. असं निलेश राणेंनी म्हंटल आहे.

तसेच, “नेहमीप्रमाणे विनायक राऊत भुंकायला बाहेर आले आहेत. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? भाजपाच्या लाटेत दोन वेळा हा माणूस निवडून आला,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

तसेच, “हिंमत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा, किती मत मिळतात ते पहा. पण ते हिंमत करणार नाही. आपण लाटेत निवडून आल्याचं त्यांना माहिती आहे”. असे म्हणत निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊत यांना आव्हान दिलं आहे. तर, “खासदारकीचा एकही गुण यांच्यात नाही. सभागृहात तर अब्रूच काढत असतात. धड बोलता येत नाही, विषय माहिती नसतात. मातोश्रीचा चप्पलचोर अशी त्यांची ओळख आहे. हा मातोश्रीचा नवा थापा आहे,” अशी खोचक टीकाही राणेंनी केली आहे.