नितेश राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे साठी विशेष गिफ्ट
राजकारण

नितेश राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे साठी विशेष गिफ्ट

मुंबई : सिंधूदुर्गच्या वैभववाडीत भाजपाचे सात नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सिंधूदुर्गाचा दौरा केला. अशातच शहांच्या दौऱ्यानंतर भाजपा नगरसेवकांचा शिवसेना प्रवेशाने राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनीही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चिमटा काढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचं जुनं प्रेम असल्याचं सांगितलं आहे. “मीदेखील बातमी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे”.

त्याचसोबत मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली, आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही, दिलं तरी ते घेणार नाही, गुच्छ दिला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे हे ७ नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा असं सांगत नितेश राणेंनी व्हेलेंनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसेनेला चिमटा काढला आहे.