त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर
राजकारण

त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर

मुंबई : भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार राजन साळवींना भाजपकडून आमदारपदाची खुली ऑफर देत त्रास होत असेल तर भाजपमध्ये या असे म्हटले आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे, असे ट्विट करत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असं वक्तव्य शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा असून ९० टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारला आहे. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. ही शिवसेनेची भूमिका नाही. मी केवळ स्थानिक ग्रामस्थांची भूमिका मांडली, असं साळवींनी स्पष्टीकरण दिलं.

त्यानंतर साळवी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत आमदार निलेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी थेट साळवींना खुली ऑफर दिली. राजन साळवी नाणारच्या भूमिकेमुळे पक्षात एकटे पडणार असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. नाणारवर घेतलेल्या भूमिकेवरुन राजन साळवी यांना जर शिवसेनेत त्रास होत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपात यावं. नाणार समर्थक आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू, अशी ऑफर निलेश राणेंनी साळवींना दिली.