साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणतात, गोमूत्र आहे हाय-अँटिबायोटिक!
राजकारण

साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणतात, गोमूत्र आहे हाय-अँटिबायोटिक!

भोपाळ : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय-अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकूर म्हणाल्या ‘आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय-अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात, असा दावाच साध्वी प्रज्ञा यांनी यावेळी केला आहे. साध्वी प्रज्ञा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
साध्वी प्रज्ञा ठाकूर सिंह यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर आता अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. गोमूत्र जर इतकं फायदेशीर असेल तर रुग्णालयांमध्ये देखील डॉक्टर देखील त्याचंच सेवन करण्याचा सल्ला का देत नाहीत? एका युझरने विचारलं आहे कि, गोमूत्रात जरी सोडियम, पोटॅशियम, क्रिएटिनिन, फॉस्फरस आणि एपिथेलियल सेल्ससारखी खनिजं असली तरीही विज्ञान त्याच्या सेवनाचं समर्थन करत नाही.