अनाधिकृत पडळकर यांचा उद्घाटन स्टंट…! : संभाजी ब्रिगेड
राजकारण

अनाधिकृत पडळकर यांचा उद्घाटन स्टंट…! : संभाजी ब्रिगेड

पुणे : राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्यासाठी संघर्ष केला आहे. त्या लढल्या, समाजहिताचे काम करत राहिल्या… अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात त्यांनी कडाडून विरोध केला. शिंदे-होळकर घराण्याचा नाव मोठ करत राहिल्या, म्हणून इतिहास त्यांच्या कर्तृत्वाची आजही प्रामुख्याने नोंद घेऊन साक्ष देत आहे. हा इतिहास आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोणत्याही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजविण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. जेजुरी येथे सुद्धा अहिल्याराणी होळकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे त्याचे उद्घाटन राज्य सरकारच्या वतीने अधिकृत केले जाईल. मात्र सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासा पोटी विरोधाचे विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार हे स्टंट करण्यासाठी पुतळ्याचे उद्घाटन करतात हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा सुद्धा अवमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा उद्घाटन करणार असेल यांच्या पोटात राजकारणाचे पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचा निषेध…

आ. गोपीचंद पडळकर यांना जर एवढेच पुतळा उद्घाटनाची घाई होत असेल तर त्यांनी ५ वर्षात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही म्हणून, भाजपने शब्द देऊन सुद्धा पाळला नाही म्हणून सुद्धा जाब विचारला पाहिजे. फालतुगिरी करायचे धंदे त्यांनी आता आमदार झाल्यामुळे बंद करावेत. जेजुरी, खंडोबा आणि राजमाता अहिल्याराणी होळकर महाराष्ट्राचे कुलदैवत आणि अस्मिता आहे. सरकारने त्यांच्या पुतळ्याचे सन्मानाने उद्घाटन करून महापुरुषांचा सुद्धा सन्मान राखला गेला पाहिजे… अशीच संभाजी ब्रिगेड आजपर्यंत भूमिका राहिलेली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी स्वतःचा किंवा पदाचा त्याग करावा. पक्षाची वेट बिगारी करण्यासाठी विनाकारण स्टंट अर्थात चमकोगिरी करू नये. अधिकृत उद्घाटन करण्यासाठी सरकारला पत्रव्यवहार करावा व मग शहाणपणा शिकवावा. असं कुठल्याही चळवळीतील कार्यकर्त्याला वाटेल. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनधिकृत उद्घाटन केलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थान समितीने व राज्य सरकारने आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.