मोठी बातमी : संजय राठोड यांचे राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण
राजकारण

मोठी बातमी : संजय राठोड यांचे राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण

मुंबई : पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन कोडींत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर आता मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार, असं माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते.

मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी त्या पक्षात आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं आरोप झाले जे काही होऊल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता.