शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत
राजकारण

शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी अद्याप अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती होणार अशा चर्चा सुरु आहेत. राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गेहलोत यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. मात्र, आज केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. आनंद शर्मा आणि पृ्थ्वीराज चव्हाण आज काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांना भेटण्यासाठी गेले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पृथ्वीराज चव्हाण गुलाम नबी आझादांच्या भेटीला

शशी थरुरु यांच्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव देखील चर्चेत असल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या भेटीसाठी जी-२३ गटातील नेते पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदर हुड्डा आणि आनंद शर्मा पोहोचले होते. राहुल गांधी यांच्यावर टीका करुन गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.