कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश
राजकारण

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस नेत्यांची अद्यापही बैठक सुरु आहे. या बैठकीत त्या २३ नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात सोनिया गांधीना यश आल्याचही बोलाल जात आहे. तर महत्त्वाच म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याबाबत जवळपास सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरली. नेत्यांची मागणी लक्षात घेता या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल आहे. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीला काँग्रेसचे 23 नाराज नेते होते. या पैकी एकाही नेत्याने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास विरोध केला नाही. त्यामुळे राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच १० जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीत बिहार निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करतानाच पश्चिम बंगाल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांची ही मागणी सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतली असून त्यांनीही राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी बोलताना, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं होता. पक्षाच्या ९९.९ टक्के कार्यकर्त्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, अशी इच्छा असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला या नेत्यांकडून विरोध होऊ नये आणि पक्षाध्यक्षपदासाठी गैरगांधी नाव पुढे येऊ नये म्हणून सुरजेवाला यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत राहुल यांच्या नेतृत्वाचा विषय आल्यावर त्याला या 22 नेत्यांनी विरोध केला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.