कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप
राजकारण

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप

नवी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्येष्ठ भाजपा नेता आणि माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अशी खरमरीत टीका राणे यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे.कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला. हा त्यांचा पायगुण. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. ठाकरे सरकार निकम्मं आहे. त्यांनी काहीच कर्तृत्व केलेलं नाही. या सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. ही उद्धवशाही नसून बेबंदशाही आहे, अशी टीका त्यांनी केली.

”गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पण कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना मृत्यूंची महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक आहे. इतर कशात नाही, पण कोरोना बळी आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्र नंबर वन झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.