फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली
राजकारण

फडणवीसांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानाचं समर्थन देण्यास नकार दिला. त्यांची ही प्रतिक्रिया कौतुकास्पद होती, त्यामुळे त्यांनी राणेंना जागा दाखवून दिली, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला आमचे समर्थन नाही. पण राणेंना आहे असे वक्तव्य केले होते. नारायण राणे यांच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. पण, भाजपच्या नेत्यांनी राणेंच्या विधानाला समर्थन देण्यास स्पष्ट नकार दिला. यावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

‘राज्याच्या पोलीस दलावर माझा विश्वास आहे, कायद्याच्या बाहेर जाऊन ते काम करत नाहीत. मुळात वातावरण चिघळवण्याची सुरुवात राणेंनी केली. त्यामुळे त्यांना अटकाव घालणे आवश्यक होतं. देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही, याचे मला कौतुक आहे. त्यामुळे राणेंना त्यांची जागा दाखवून दिली, असं राऊत म्हणाले.