धुळे जिल्ह्यात वाढणार युवासेनेची  ताकद
राजकारण

धुळे जिल्ह्यात वाढणार युवासेनेची ताकद

गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका करण्यात आल्या.धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा युवाधिकारी व युवा सेना सरसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या शिफारशीने या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे आता धुळे जिल्ह्यात युवासेनेचे ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नितीन गायकवाड यांच्याकडे उपजिल्हा युवा अधिकारीपद, तर बाळासाहेब उर्फ चेतन देवरे यांच्याकडे तालुका युवा अधिकारी पदाची जबाबदारी आहे. देवरे हे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. दरम्यान, तालुका युवा अधिकारी पदी नेमणूक झाल्यावर बाळासाहेब उर्फ चेतन देवरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

ते म्हणाले की, “पूर्वापार साहेबांच्या विचार सर्वश्रेष्ठ मानत मी काम करत आलो. त्यामुळे आज पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे.त्या जबाबदारीचे,त्या संधीचे निश्चितच सोने करेल तसेच पक्ष नेतृत्वाच्या सगळ्याच अपेक्षांना खरे उतरण्याचा प्रयत्न करेल.

रमेश शिंदे,महेश खैरनार यांच्याकडे देखील तालुका युवा अधिकारी पदाची जबाबदारी आहे. पंकज गवळी आणि दीपक साळुंखे हे साक्री शहर युवा अधिकारी म्हणून काम सांभाळतील तर केशव शिंदे साक्री तालुका समन्वयक अधिकारी असणार आहेत.

प्रतिक पाटील,पंकज मानकर,दिपेश चौधरी,सुधीर बोरसे,रविंद्र खैरनार, हिम्मंत सोनवणे,आकाश खैरनार,चिंतामण ठाकरे,सचिन बेडसे,मनोहर गांगुर्डे,देविदास सोनवणे आदी उप तालुका युवा अधिकारी म्हणून काम बघतील. तसेच अजय जाधव,वैभव भिंगारे,जगदीश भोई,आशिष मारनर,वैभव सोनार, पवन सोनवणे,चेतन क्षीरसागर,मयूर नांद्रे यांच्याकडे उपशहर युवा अधिकारी पदाची जबाबदारी असणार आहे.