द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राजकारण

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होत आहेत. याशिवाय खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं हे विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.