बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ: संजय  राऊत
राजकारण

बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ: संजय राऊत

मुंबई : ‘या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरु. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो,’ असे ट्विट करत प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रस्त्यावर उतण्या संबधीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ५ जानेवारीला शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा चर्चा सुरु असतानाच संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ट्विट करत याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेने ईडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायचे ठरविल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे समजते. मात्र संजय राऊतांनी ही सर्व वृत्त फेटाळून लावली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना इडीने नोटीस पाठवली. त्यानंतर काही दिवसातच वर्षा राऊत यांनादेखील ईडीची नोटीस आली. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.