तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल
राजकारण

तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल

हैद्राबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैद्राबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना केली होती. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नाव बदललं जाईल पण हैद्राबादचं नाव बदललं जाणार नाही, असे औवैसींनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओवैसी पुढे म्हणाले, तुमची पिढी संपेल पण हैद्राबादचं नाव भाग्यनगर होणार नाही, एका सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल पण शहाराचं नाव हैद्राबादच राहणारआहे. निवडणूक हैद्राबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हैद्राबादचं नाव बदलू नये तर एमआयएमलाच मतदान करा, असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. ते नाव बदलू इच्छित आहेत. त्यांना सर्व जागांची नावं बदलायची आहेत, असेही ओवैसी म्हणाले.

सध्या ही निवडणूक हैदराबादची आहे असं वाटत नाही. जसं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी दुसऱ्या पंतप्रधानांसाठी निवडणूक घेत आहोत असं वाटत आहे. मी करवन मध्ये एका रॅलीत होतो. तेव्हा सर्वांनाच या ठिकाणी बोलावण्यात आल्याचं समजलं. एका मुलानंही सांगितलं ट्रम्पना या ठिकाणी बोलावायला हवं होतं. त्याचं म्हणणंही योग्य होतं. आता केवळ ट्रम्पच येणं शिल्लक आहे, असेही औवैसी म्हणाले.